महाराष्ट्रीय बेंदूर
स्वरूप[संपादन]
हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो.पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.
या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात.गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस पोळ्याची गीते म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, ज्याला गावात मान आहे तो-गावचा श्रीमंत तोरण तोडतो व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास पैसे देण्यात येतात. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.
"नाही दिली पुरणाची पोळी "
तरी राग मनात धरनार नाही
फक्त वचन द्या मालक मला
"मी कत्तलखाण्यात मरनार नाही."//1//
शिवारात राबणारा बळी
राजा अन् सर्जा राजाच्या
भरपुर कष्टानंच
बहरतंय शिवार सगळं.//2//
आज महाराष्ट्रातील जो माझा शेतकरी बांधव आहे. प्रत्येक जनांनचे बैल, असेल गाय,म्हैस आसुदे यांची काळजी घ्या. बैल हा शेतकरी याचा सखा मानला जतो . पण त्याची काम करण्याची ताकद कमी झाली आम्ही त्यांना कत्तलखाण्यात मारतो तर आज दि 04-07-2020 बैल पोळ्या निम्मित सर्व शेतकरी बांधव यांना विनंती करतो. कि बैल,गाय,म्हैस असेल यांना कत्तलखाण्यात पाटवू नका. शेतकरी बांधव याच्या घरातील दुसरे घरा हे बैल,गाय, म्हैस यांचे असते असे म्हणतात.
माझी पुन्हा एकदा विनंती आहे शेतकरी बांधवांना कि तुमचे दुसरे घर बैल, गाय,म्हैस यांचे ते कत्तलखाण्यात पाटवून तोडू नका.
"आज सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. "
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा