निसर्ग हा आपला मित्र

        निसर्ग ही देवाने आपल्या मनुष्य प्राण्याला दिलेली सर्वात मोठी देणगीच आहे.  असे म्हणावे लागेल  कारण निसर्ग सौंदर्य पुरेपूर आपल्या मनात भरण्यासाठी जगा पण त्यानेच दिली आहे असेही म्हणाले तरी चालेल कारण निसर्ग प्रेम हे वेगळे असते. जगातील   कोणतीही गोष्ट तुम्ही विसरू शकता पण निसर्गाला कधीच नाही. या जगात आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिवरायांचे किल्ले जे निसर्गालाही लाजवेल असे आहेत मग तो कोणताही किल्ला घ्या वो त्या किल्ला बांधणाराच एक परमेश्वर होता.
     खरतर निसर्ग हा प्रामुख्याने पशूपक्षी प्रणी हा निसर्गाची एक विशेष भाग आहे. आणखी आपण निसर्गाची ओळख करायला गेलो कि माझ्या राज्याचे      1. गडकिल्ले.
2. झाडे पशू ,पक्षी आणि अन्य लहान मोठे किटक. 
3. उंच उंच पर्वत डोंगर. 
4.  नद्या,धबधबे हि निसर्गाची एक नसा आहेत.
5.  खरतर या निसर्गा मध्ये आणखी एक म्हणजे पाउस       हा निसर्गातील सर्वात आवडता ॠतु सगळे मनुष्याला       एखाद्या सनासुधीचे दिवस असतात.
6. माती 
7. आता निसर्गातील सगळ्यात मोठा घटक म्हणजे समुद्र       हा निसर्गातील 71% भाग या मोठ्या निसर्गाचा आहे.
    खरतर या सहा गोष्टी या निसर्गाची खुप मोठी देणगी आहे कारण मनुष्य प्राणी किती शक्तिशाली आसला कितीही ही कितीही बुद्धीमान असुदे त्याला निसर्गा समोर झुकावे लागतेच. करण आपण सगळे जे काही करतो हे निसर्गाच्याच जिवावर करतो. पण आता मनुष्याची माणसिता ही निसर्गाच्याच पलिकडे गेली आहे पण काही को एकमेकां ऐकून घेण्यासाठी कोणाकडे वेळ  आहे का.
तेव्हा ति लोक निसर्गाला वेळ देतील. 
      निसर्ग ही एकमेव गोष्ट आहे कि "तुम्ही निसर्गाला जपले तर निसर्ग तुम्हाला जपेल नाहीतर निसर्गाचा तडाखा सहन करावा लागेल "  खरच आम्ही कधी घेतो का निसर्गाची काळजी नहीना घेत आम्ही नाही समजत आता तरी पहा या निसर्गाची ओळख. 
       1.   गडकिल्ले:- जगातील सगळ्यात वैभवाची किंवा वैभवशाली गोष्ट ही गडकिल्ले आहेत.  कुठेही जावा वो जगात आशी कोणतीही गोष्ट नाही वो गडकिल्ले असावे तर माझ्या महाराष्ट्रा सारखे ही निसर्गाची छाती उंच होण्यामागील कारण आहे. जगात भरपुर किल्ले आहेत पण निसर्गाला लाजवेल असे किल्ले फक्त भारतातच मिळतात मग आमचे कोणतेही किल्ले  हा आहे निसर्ग या निसर्ग कोणला म्हणायचं तर पावसाळ्यात कोणत्याही गडकिल्ल्यावर जा आणी उभे राहून  जी हिरवीगार गवत असेल राणातील पिके पहा त्यावेळी समजते निसर्ग म्हणजे काय निसर्गातील 40% वाटा हा गडकोटांचा आहे .
    2. निसर्ग म्हणजे फळे, फुले येतातच पण त्यांना येण्यासाठी जे काही केले जाते हा निसर्गाचा प्रकारच आहे. आपण झाडे लावतो पण त्याची पहाणी करत नाही निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याची जोपासना करणे म्हणजे तरेवरची कसरत केल्यासारखे असते. आपल्याला निसर्ग हा सगळं विनामूल्य देत आसतो पण आम्ही कधी त्याच्याकडे लक्ष देतो कि आमची शोकांतिका आहे निसर्गामध्ये झाडे महत्त्वाची भुमीका निभवत असतात.  निसर्गामध्ये असंख्य जीवसृष्टी आहे तुम्ही मग ते कोणतेही किटक किंवा जिव असतात वेग वेगळी असंख्य झाडे पण असतात. निसर्गामध्ये मानवी गरज भागवण्यासाठी निसर्ग हा तत्पर असतो. निसर्गामध्ये नैसर्गिक अन्नसाखळी असते.  त्यानुसार पुढे:-
   खरतर मानवी जीवनातील गरज ही निसर्गावर अंवलंबून असते. मानव हा वनस्पती जन्न पदार्थांचे सेवन करत असतो. मानवी जिवन हे परपोशी आहे नैसर्गिक नियमानुसार मनुष्य स्वतःचे अन्न हे वनस्पती पासूनच मिळते. खरतर वनस्पती या स्वतःचे स्वतः तयार करतात त्यामुळे त्या स्वयंपोशी असतात. उर्वरित सर्व जिवांना एकमेकांवर अवलंबून राहावे लागते.खरतर जगातील सर्व प्राणी परपोशी असतात पण ते प्रणी कच्चा स्वरूपात आन्न खाउ शकतात.  उद:- हात्ती, घोडे, अन्य प्रणी जिव
पण मनुष्य प्राणी ह्यांना मात्र अन्न साठी प्रक्रिया करावी  लागते. 
    3. आपले निसर्गाचे गमक म्हणजे उंच च्या उंच पर्वत हे निसर्गाच्या नियमानुसार ज्वालामुखी चा उद्रेक झाल्यावर या पर्वतांची उत्पती झालेली आहे सांगण्यात आले आहे. निसर्ग नियमानुसार पर्वत हे उंची खुप असलेली दिसून येते. अपण ऐखादे उदाहरण घ्यायला काही हरकत नाही कि वनस्पती ही वनस्पती आपण तिला वर्षभर पाणी घलत असतो पण तिची वाढ जास्त होत असलेली दिसून येत नाही.  पण पावसाळ्याच्या दिवसात माञ त्या ज्या वनस्पती आहेत बहरलेली पहायला मिळतात.  यालाच निसर्ग म्हणतात. 
     आपण एक गोष्ट लक्षात घेतो मोठी मोठी पर्वत जे काही आहेत. तर तिथे पाणी कुठून येते हा प्रश्न कही जनांना पडेल कि पर्वतावर उन्हातही झाडे हीरवी कशी असतात. तर पहा कि पर्वत हा उंच असतो आणि मातीचा थर मोठा असल्यामुळे त्या पर्वतामध्ये पावसाचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे पर्वतावरील वनस्पती उन्हातही हिरवी गार असतात. पण त्या वनस्पतींची सुध्दा गम्मत असते. काही काही वनस्पती या उन्हाळ्यात त्यांचे अगदी नामोनिशान नसते. पण काही वनस्पती या उन्हाळ्यात तग धरून असतात. त्यामुळे पर्वतावरील निसर्ग सौंदर्य वेगळेच असते. निसर्ग हा मानवाचा एकमेव मित्र असल्या दिसून सारखे असते .त्यामुळे मानवी जीवनात निसर्गाला  एक दैवी रूपाचे स्थान आहे. त्यामुळे ऋतु हे वैकल्पिक जिवणात गरजेचा भाग आहे. 
4. आपण निसर्गाची देन म्हणजे नद्या, सरोवर, धबधबे ही एक गोष्ट वेगळीच आहे. नद्या या डोंगर दरीतून त्यांचा उगम झालेला दिसून येतो छोटासा पाण्याचा प्रवाह पुढे जावून येवढा मोठा जलसागर होतो . पण आपण कधी नदीच्या उगमा पर्यंत  गेलो का हा आपण विचार केला पाहीजे. लेख लिहावा पण तो लवकिकाला साजेल आसा असावा तसे निसर्गामध्ये लवकिकाला साजेल असा नदी आणि सरोवरे आहेत. 
         आज आपण कधी पहतो का कि निसर्गाची काळजी घ्यावी यासाठी आपणनही काहीतरी केले पाहीजे.
निसर्ग हा आपल्या सभवताली आहे.  विषेश काळजी घेणे आवश्यक असते.  पहायला गेलो तर निसर्ग चक्र हे आहे त्यामध्ये प्राणी,पशू ,पक्षी आणि वनस्पती मानवी जीवन याचाही समावेश होतो. आणी या नद्यांचा उल्लेख सरोवर या मध्ये  नसा म्हणून केला आहे कारण त्या मागील प्रमुख कारण म्हणजे नदी ही पाणी प्रत्येक भूतलावरील पशू, प्राणी, पक्षी हे यांना पाण्याची अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना शरीरातील जशा नसा असतात तश्याप्रमाणे नद्या पण पर्यावरणाच्या नसा असे संबोधले जाते. 
  6.  आपण किंवा एखादे मुल जन्माला येते तेव्हा मातीत जास्त असलेले आपण पहीले आहे निसर्ग चक्र हे तुम्हाला घडवत असते आणी आणि आपण घडत जातो.  निसर्ग हा मानवाची जडन घडण करण्याचा प्रयत्न करत असतो. निसर्गामध्ये मानवाला पहीजे त्या गोष्टींची पुरेपूर आनंद लुटण्यासाठी निसर्ग अगदी तयार आहे कोणीही जावावे आणि निसर्गाचा केव्हाही आनंद लुटावा असे काहीतरी असते.  निसर्गामध्ये माती ही आपल्याला एका ह्रदय स्पर्शाची आठवन करून देते. मानवी जीवन हे पुर्ण पणे निसर्गावर अंवलंबून आहे. त्यामुळे माती या घटकाला विसरून चालत नाही. 
          निसर्गाला जपा निसर्ग तुम्हाला जपेल. 

     
     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रीय बेंदूर

TYPES OF NERVE CELLS / NEURONS

पिक कर्ज मिळविण्याचा मार्ग मोकळा