देशात कृषी स्टार्टअपला वाव

    organic farmimg | Organic farming, What is farming, Home vegetable ...

   देशात कृषी स्टार्टअपला वाव 

'कृषी स्टार्टअपला : संधी व आव्हाने ' विषयावर वेबिनारमध्ये विश्लेषकांचे मत 

            पुणे दि . १३.   जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा स्टार्टअप भारतातील असतो. भारतात शेतीशी संबंधित स्टार्टअप प्रकल्पांना खूप वाव आहे . काटेकोर शेती , मार्केट लिंकेजेस , पुरवठा साखळी आदि क्षेत्रात अनेक संधी आहेत . स्टार्टअप कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान भागीदारी करण्याचे व त्यांना डिजिटल सेवा पुरवण्याचे मायक्रोसॉफ्टचे धोरण आहे , अशी माहिती स्टार्टअप इकोसिस्टिम , मायक्रोसॉफ्ट ' च्या संचालक संगीत बावी यांनी दिली . अग्रो व्हिजन फाऊन्डेशन आणि अग्रो स्पेक्ट्रम यांचा वतीने 'कृषी स्टार्टअप : संधी व आव्हाने वेबिनारमध्ये त्या बोलत  होत्या . 

Top Most Profitable Agriculture Business Ideas
                       
            '' देशात दरवर्षी ५० हजार कृषी पदवीधर विद्यापीठातून बाहेर पडतात ; परंतु कृषी उदयॊजकता विषयाबद्दल त्यांच्यामध्ये फारशी जनजागृती नाही, "असे निरीक्षण नॅशनल अकॅडमी ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट संचालक डॉ . श्रीनिवास राव यांनी नोंदवले .

 
             भारतीय  कृषी संशीधन परिषदेतर्फे शेतीशी संबंधित स्टार्टअप प्रकल्पांना उत्तेजन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व योजनांची माहिती त्यांनी दिली . देशात कमी जमीनधारणा क्षेत्र हि प्रमुख समस्या असली तरी    एफपिओ , एफपिसी  माध्यमातून त्यावर मात करणे शक्य आहे , असेही त्यांनी सांगितले. '' देशात ऑग्री बिजनेस सेंटर योजनेच्या माध्यमातून सुमारे ७२ हजार प्रकल्प उभे राहिले; परंतु त्यातील केवळ चार अशी  माहिती  मॅनेजच्या कृषी विस्तार विभागाचे संचालक डॉ . राज सरवणन यानी  दिली . 
             '' राष्ट्रीय  संशोधन विकास परिषदेचे कृषी स्टार्टअपला शेकडो नवीन कालपनांचा साठा असून उद्योजकांना नवीन व्यवसाय सुरु  करण्यासाठी त्याचा मोठा फायदा होईल,'' असे मत परिषदेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय साचलक  एच . पुरषोत्तम यांनी व्यक्त केली . पेमेंट नोंदवण्यासाठीहि परिषद मदत करत असल्याची माहिती साल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी .डी . मायी , ऍग्रोव्हिजन फाउंडेशन अध्यक्ष रवी बोरटकर याची सांगितले. 
   Agriculture in India! Opportunities, challenges and factors that ...
सरकारची धोरणे अनुकूल :
       लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढल्यामुळे अन्न  क्षेत्रातील स्टार्टअप प्रकल्पना खूप वाव आहे . तसेच प्रक्रिया निर्यात , सांधनसंपत्तीचे जतन , डेटा  मॅनेजमेंट आदी विषयातही मोठ्या संधी आहेत . कृषी स्टार्टअप   प्रकल्पासाठी सरकारची धोरणे अनुकूल आहेत. देशात क्षेत्र स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटरची संख्या वाढत आहे. परंतु तुकड्या तुकड्यातील विभागलेले क्षेत्र आणि स्थानिक मागणी तसेच हंगामी व्यवसाय , कमी आर्थिक गुंतवणूक हि स्टार्टअप ची   उद्योगापुढील आव्हाने आहेत, असे मॅनेजच्या कृषी विस्तार विभागाचे संचालक  डॉ . राज सरवणन यांनी सांगितले . 

       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रीय बेंदूर

TYPES OF NERVE CELLS / NEURONS

पिक कर्ज मिळविण्याचा मार्ग मोकळा