आम्ही शेतकरी बांधव

                                                                                                                                       
SMART AGRI-TECH CO., LTD. - organic fertilizer,organic chemical ...
 
             आपले  शेतकरी बांधव अनेक वेळा किटकनाशके,बुरशी किंवा तननाशके ही औषधे शेतात फवारणी करण्यासाठी वापरतात कारण शेतातील तनांना मारून शेतीतील पिक चांगले यावे यासाठी आपले शेतकरी बंधू जे असतात ते औषध फवारणी करत असतात. यामध्ये एकाच वेळी तण रोग किंवा किडे,आणि पाणावरील मोठे किडे यांचा यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारणीची  जास्तीत जास्त वापर केला जावा हा त्यातील उद्देश असते. आत्ता कोणत्याही औषधांचे मिश्रण करताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे मिश्रण बरोबर न झाल्यामुळे फायदा होण्याएवजी तोटा होण्याची शक्यता आहे. जर का आपल्याला तोटा होऊ द्यायचा नसेल तर मिश्रण एकत्र करताना कोणती काळजी घ्यायची कशी ते पाहूया. 
    
            पिकांच्या वाढिच्या विविध टप्प्यमध्ये   वेेेेगवेगळ्या किडकिंवा रोगांचा प्रादुुर्भाव होत आसतो. त्यांंच्यायावर नियंत्रण ठेेवण्यासाठी एकात्मिक किड नियंत्रणाचा वापर करणे गरजेचे असते.  आर्थिक नुकसान वाढण्यापेेक्षा किडिंची संख्या अधिक झाल्यानंतर फवारणीचे नियोजन आखावे. कधी कधी शेेेतामध्ये किड व रोग हे एकाच वेळी आलेले आपल्याला दिसून येते.  आशा वेळी शेतकरी तणनाशक किंवा बुरशीनाशक यांचा वापर  एकाा वेळी करतातत.  कारण काम थोडे हालके होते आणि कामाचा वेेळही वाचतो. या व्यतिरिक्त किडिंंच्या नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणेे किटकनाशकाांच्या मिश्रणांची फवारणी केली जाते. तणांवर  नियंत्रण ठेवण्यासाठीही अनेक वेळा दोन तननाशकांचे मिश्रण केेेेले जाते.परंतु कोणत्याही गोष्टीचा त्याची चााचणी करणे गरजेचे आहे आपण कोणत्याही रसायनांच्या मिश्रण एकजीव करण्या आधी चांगले सुुुुरक्षि  त आहे का याची तपासणी करून घेणे. 
Best Agrochemical Manufacturing Company In India | Dhanuka ...
             
            काहीवेळा कोणत्याही दोन रसायनांचे मिश्रण एकजीव  करताना शास्त्रज्ञ दृष्टीने विसंगत  ठरते. हि विसंगता पुढिल तीन मुद्द्यावर आहे. 
        १ . रासायनिक विसंगता: 
             दोन कीडनाशकांमधील रासायनिक घटकांची अभिक्रिया होऊन वेगवेगळे घटक तयार होतो. परिणामाने किटकनाशकाांची काम करण्याची ताकद कमी होते.  दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त घटकांचे विघटन होऊन कामी करण्याचे घटक तयार होतात.
        २. जैविक विसंगतता: 
           दोन वेगळे रसायने किंवा किटकनाशकाांच्या मिश्रणांची फवारणी केल्यानंतर कही वेळात औषध फवारणी केलेल्या किंवा आसपासच्या झाडावर त्याचा एक ते दोन दिवसात दुष्प परिणाम दिसून येतात.  उदा. पाने सोखणे, झाडांची वाढ खुंटणे, पाने चुरगळणे, झाड सोकून जाने,झाडाचे फळे खराब होणे, येणारे पीक वाळून जाणे.
        ३.  भौतिक विसंगता:
             दोन किंवा तिन किटकनाशे एकत्र मिसळल्यानंतर त्यांच्या भौतिक गुणधर्म या मध्ये काही प्रमानामध्ये बदल होतो. त्यापैकी एक किटकनाशक फवारणीसाठी धोकादायक किंवा स्थिर राहू शकत नाही. 
अशा मिश्रणामधील तरल व घन वेगळे होणे.  स्फोटकांन मधून धूर निघण्याचा भिती बाळगणे गरजेचे असते. मिश्रणामध्ये गोळे तयार होणे ह्या गोष्टी आढळून येतात. असे झाल्यास मिश्रण फवारणी करू नये. यासाठी कोणत्याही रसायनांचे मिश्रण तयार करण्या आधी भौतिक विसंगता तपासणी करावि. 

                 भौतिक विसंगतता चाचणी कशी करावी :
            भौतिक विसंगतता तपासणी साठी मिश्रणांची चाचणी करावी.  या मध्ये एका बॅरेल मध्ये किटकनाशक मिश्रण करण्यासाठी किटकनाशकाची कमी आधिक प्रमाण (210 लिटर/1 एकर ) इतके प्रमाण बॅरेल मध्ये मिक्स करणार आहोत,  त्याच प्रमणात पण कमी मात्रा मधे पाणी घेऊन (80 ते 100) .मि.ली. एका प्लास्टिकचे भांडे जे कचेसारखे असते तसे त्याच्या मोठ्या तोंडाच्या भांड्यामध्ये मिश्रण घ्यावे. निर्देशित क्रमाने किटकनाशकाांचे मिश्रण तयार करावे या भांड्याला घट्ट झाकण लावावी . मिश्रण जोराने ढवळले की.ते कमीत कमी दोन तास न हलवता तसेच ठेवावे किंवा रात्रभर ठेवले तरी चालेल. त्यानंतर त्या मिश्रणावरून सांगत कि विसंगत आहे हे ठरवावे.  

                    एकत्रित मिश्रण करताना घ्यायची काळजी :
            कीटकनाशकांबरोबर मिळालेले माहिती देणारे जे पात्र असते ते काळजी पूर्वक त्याचे वाचन करणे गरजेचे असते . त्यामधील माहिती दिलेल्या प्रमाणे बॅरेल मध्ये मिश्रण करण्यासाठी त्या पात्रात दिले आहे तसे करणे त्यामध्ये लिहिलेले आहे का नाही याची खात्री करून घेणे. दिलेल्या पत्रा नुसार मिश्रण तयार करून घेणे. दिलेल्या माहिती पत्रकानुसार कीटकनाशक मिश्रणाची माहिती दिली नसल्यास भौतिक चाचणी केल्याविना फावारणी करु नये . भौतिक चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्याच मिश्रणाची लहान भागातील झाडांवर फवारणी करावी झाडावर दुष्परिणाम ,  मिश्रणाची किडींच्या नियंत्रणाखाली परिणामकारकता व अनावश्यक कीटकनाशकांचे अंश याबाबत तपासणी करावी  याला पाच ते दहा दिवस लागू शकतात . 
            विद्राव्य खाते टॅंक मध्ये ममिक्स करायची असल्यास दिलेल्या माहिती पत्रकामधून तसेच गरज भासल्यास भौतिक चाचणी करून खत्री करून घ्यावी .   खतांमुळे मिश्रणातील पीएच बदलू शकतो . ती  कीटकनाशकांसोबत वापरल्यास कीडनाशकांमधें वेगळीच गरज नसलेली क्रिया घडण्याची शक्यता असते  कीडनाशकातील नियंत्रणाची ताकद कमी होऊ शकते . मिश्रणात कीडनाशकांच्या महतीपत्रानुसार मात्रेचाच वापर करावा . तसेच मिश्रण करताना कीडनाशकांचा जो क्रम असतो , तो तंतोतंत पाळणे गरजेचे असते . 
 
                     मिश्रम तयार कसे तयार करायचे व त्याची संख्येकी क्रमवारी नुसार कसे तयार करायचे :
            बॅरेल पाण्याने अर्धा किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त भरून घेणे आणि ते पाणी ढवळण्याला सुरवात करणे . त्यांनतर त्यामध्ये  पहिल्यांदा पाण्यात मिसळणारी पावडर स्वरूपातील रसायन पाण्यात मिसळणारे. त्यानंतर तेलात मिसळणारे द्रावण पाण्यात वाहणारे ओले. (एफ एल) सस्पेनशन कन्संट्रेड (एस.सी) पाण्यात प्रवाही (ई सी) याक्रमाने किसनाशके मिसळुन बॅरेल तीन चतुरतांश भरावी . यानंतर तेल पसरणारे / चिकटणारे पदार्थ / स्टिकर  वेटिंग एजंट किंवा विद्राव्य खाते या मिश्रणात गरजेनुसार घालावेत . भरेल बॅरेल पूर्ण भरून ढवळावे 
कीडनाशके हाताळण्याची घ्यायची  काळजी :
            कीडनाश्काच्या डब्यावरील लाल रंगाचे आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके सर्वात विषारी असतात , त्यानंतर पिवळा, निळा, हिरवा असा  क्रम लागतो . 
            मिश्रण बनवताना  संरक्षक कपडे , बूट ,हातमोजे नाकावरील मास्क इ . चा वापर करावा.     
            कीडनाशकाचे प्रमाण बनविताना, डबे  उघडताना ,  मात्र  मोजताना  त्यातून निघणारी  विषारी वाफ धूर  उडणारा पिटाच्या स्वरूपातील पावडर नाकावाटे किंवा, डोळ्यांमध्ये जाणार नाही व सरळ त्वचेशी संपर्क होणार नाही याची काळजी घ्यायची . 
           द्रावण बनविण्यासाठी ठिकाणी खाद्यपदार्थ  किंवा पिण्याचे पाणी ठेऊ नये. कीटकनाशकाच्या पर्यावरणाशी कमीत कमी संपर्क होईल याची काळजी घ्यावी. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रीय बेंदूर

TYPES OF NERVE CELLS / NEURONS

क्रीडा विश्व