क्रीडा विश्व
MI vs CSK IPL 2020 : पहिल्याच सामन्यात धोनीने पूर्ण केले 'हे' शतक नवी दिल्ली .दि . २० पहिल्याच सामन्याच चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शतक केल्याचे पाहायला मिळाले. धोनीचे हे शतक धावांचे नक्कीच नव्हते. पण धोनीने यष्टीमागे राहून कमाल केली आणि आपले शतक पूर्ण केले. हा मोसम सुरु होण्यापूर्वी चेन्नईविरुद्ध मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज हा रोहितंच ठरला होता. आतापर्यंच्या चेन्नईविरुद्धच्या सामन्याच रोहितने ६४६ धावा केल्या आहेत. आतापर्यंत मुंबईच्या एकाही खेळाडूला चेन्नईविरुद्ध एवढ्या धावा करता आलेल्या नाहीत. या सामन्यात रोहितला १२ धावाच करत आल्या. त्यामुळे आतापर्यंत चेन्नईविरुद्ध रोहितच्या ६५८ धावा झाल्या आहेत. आतापर्यंत मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने ६२७ धावा केल्या आहेत. त्यामुळे धोनीने या सामन्यात जर ३२ धावा केल्या तर तो रोहितचा विक्रम मोडू शकतो. प्रतिस्पर्धी संघातील पहिला सर्वाधिक धावांचा विक्रम यापुढे धोनीच्या नावावर होऊ शकतो. ...