क्रीडा विश्व
रोहित शर्माच्या बॅटिंगवर गावसकर म्हणतात.
कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा जसं पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करतो.
मुंबई . २३. उपकर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीवर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर दिलो जानसे फिदा झाले आहेत. गावसकर यांनी रोहित शर्माच्या फलंदाजीचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मासारखी फलंदाजी करायला आवडलं आसते, असे गावसकर म्हणाले. ते इंडिया टुडेशी बोलत होते.
कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारे पहिले फलंदास सुनिल गावसकर रोहित शर्माची स्तुती करताना म्हणाले की, त्यावेळची परिस्थिती आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे मला रोहित शर्मासारखी मनसोक्त फलंदाजी करायला जमलं नाही. कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा जसं पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करतो तशीच फलंदाजी करायला मलाही आवडलं आसते. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांविरोधात आरामात खेळणाऱ्या रोहित शर्माचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याची फलंदाजीची शैली इतरांपेक्षा वेगळी आहे. विराट कोहलीनंतर रोहित शर्मा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, असे गावस्कर म्हणाले.
त्यावेळची असणारी परिस्थिती शिवाय आत्मविश्वासाच्या अभावामुळे मला मनमोकळे पणानं फलंदाजी करताना आली नाही.. पण आताच्या नव्या जनरेशनच्या क्रिकेटपटूंना खेळताना पाहून आनंद वाटतो. युवा खेळाडूंची फलंदाजी पाहून आनंद वाटतो, असेही गावसकर म्हणाले.
३३ वर्षीय रोहित शर्मानं एकदिवसीय सामन्यात सलामीवीर म्हणून २७ शतकं झळकावली आहे. एकदिसीय सामन्यात रोहितच्या नावावर चार द्विशतकांचाही समावेश आहे. क्रिकेट तज्ज्ञ, माजी खेळाडू आणि चाहते रोहित शर्माला सर्वात धोकादायक सलामी फलंदाजी म्हणतात. २०१३ पासून रोहित शर्मा नियमीत सलामीफलंदाज म्हणून भारतीय संघात खेळत आहे. याआधी २०११ मध्ये रोहित शर्मानं तीन वेळा सलामी फलंदाजी केली होती. पण २०१३ मध्ये घरच्या मैदानावर सलामीला फलंदाजी करताना रोहित शर्मानं ८३ धावांची खेली केली. तेव्हापासून रोहित शर्मानं आतापर्यंत मागे वळून पाहिलं नाही.
परिस्थिती सुधारल्यावर देशांतर्गत क्रिकेट सुरू!
‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीचे संलग्न राज्य संघटनांना आश्वासन
नवी दिल्ली : करोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर सुरक्षित वातावरणात देशांतर्गत क्रिकेट सुरू करता येईल, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने संलग्न राज्य संघटनांना दिले आहे.
दर वर्षी स्थानिक क्रिकेटचा हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होतो. परंतु यंदा करोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ने कोणतीही तारीख निश्चित केलेली नसल्याचे गांगुलीने गुरुवारी राज्य संघटनांना पत्र पाठवून कळवले आहे.
आता सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसह स्थानिक क्रिकेटचा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात या स्पर्धेला प्रारंभ होऊ शकेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
‘‘परिस्थितीच्या अनुकूलतेनंतर देशांतर्गत क्रिकेट सुरू करता यावे, यासाठी ‘बीसीसीआय’ सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या स्पर्धामध्ये खेळणारे खेळाडू आणि निगडित व्यक्तींचे आरोग्य आणि सुरक्षितता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ‘बीसीसीआय’ या सर्व बाबींवर सातत्याने निरीक्षण करीत आहे,’’ असे गांगुलीने संलग्न संघटनांचे अध्यक्ष आणि सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
या वेळी गांगुलीने भारताच्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकााचीही माहिती सर्व संघटनांना दिली. वर्षांच्या उत्तरार्धात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तसेच २०२१च्या पूर्वार्धात मायदेशात इंग्लंडविरुद्ध मालिका होणार आहे. याशिवाय पुढील वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आणि २०२३ मध्ये एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक स्पर्धेचे भारत यजमानपद सांभाळणार आहे.
‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम नियोजित वेळापत्रकानुसार पार पाडण्यासाठी ‘बीसीसीआय’ आणि भारतीय क्रिकेट संघ प्रयत्नशील आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. मग पुढील वर्षी फेब्रुवारीत भारताची मायदेशात इंग्लंडविरुद्ध मालिका रंगणार आहे. यानंतर एप्रिलमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) -२०२१चा १४वा हंगाम आयोजित करता येईल,’’ असे गांगुलीने म्हटले आहे. भारतीय महिला संघाच्या मालिकांसंदर्भात आमची बोलणी सुरू आहे, असे गांगुलीने सांगितले.
देशांतर्गत क्रिकेट हंगाम सुरू करण्याबाबतच्या कृती आराखडय़ाविषयी सर्व संघटनांना योग्य माहिती देण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. येत्या काही महिन्यांत देशातील करोनाची साथ नियंत्रणात येईल आणि सुरक्षितपणे क्रिकेट सुरू करता होईल.
-सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा