अँड्रॉइड फोनला हॅकर्सचा धोका
सावधानता बाळगण्याचे सायबर विभागाचे आवाहन
मुंबई,ता . १९ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकडाऊन लागू असताना सायबर गुन्हेगारांना अँड्रॉइड स्मार्टफोन वापरनाऱ्यांना लक्ष करण्यात सुरवात केली आहे. हॅकर्सनी अँड्रॉइड मालवेअर विकसित केले असून, हे डाउनलोड झाल्यास स्मार्टफोनमधील सर्व माहिती हॅकर्स कडे जाण्याची भीती असून , यासाठी सावधानता बाळगण्याचे आवाहन सायबर विभागाने केले आहे .
राज्यात काही गुन्हेगारांनी आणि समाजकंटक लोकडाऊन स्थितीत गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या गुन्हेगार तसेच समाजकंटकविरोधात महाराष्ट्र सायबर सर्व आयुक्त तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून धडक मोहीम राबवून त्यांच्यावर कठोर कारवाई करत आहे. त्यात प्रामुख्याने फेसबुक , ट्विटर आणि अन्य सोशल मीडिया माध्यमावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर करडी नजर ठेवण्यात येत असण्याचे सायबर पोलिसांनी सांगितले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा