आयपीएल चा अंतिम सामना पुढे ढकलणार
यापूर्वी आयपीएल आयोजन १९ सप्टेंबरपासून यूएई मध्ये होणार होते . अंतिम सामना ८ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार होता. ८ एवजी १० नोव्हेंबरला अंतिम सामना होणार असल्याचे समजते.
दिवाळीच्या आठवड्यात आयपीएल सामने अंतिम टप्प्यात असायला हवे , अशी प्रसारणकर्ते स्टार इंडियाची मागणी होती. यामुळे टीव्ही प्रेक्षकांच्या संख्येत भर पडेल शिवाय जाहिरातदार वाढतील, असा यामागे तर्क होता. बीसी सीआय मात्र याकडे दुर्लक्ष केले. तथापि आता त्याचाही आग्रह लक्षात घेत अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबर खेळवण्यावर येत्या तीन दिवसात अंतिम निर्णय होईल, असे दिसते. बीसीसीआयच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक २ ऑगस्ट रोजी होणार आहे .
यामागील दुसरे कारण असे कि यूएईत अंतिम सामना खेळल्यानंतर भारतीय खेळाडू दिवाळीसाठी भरतात परतणार होते . मात्र आता १० नोव्हेंबर रोजी अंतिम सामना आटोपताच खेळाडू घरी न परतता यूएईतुन थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रावणा होतील, असे मानले जाते . आयसीसीने विश्वचषक आणि बीसीसीआय ने आयपीएल साठी आशिया चषक रद्द केला . त्यानंतर आयपीएल १९ सप्टेंबर पासून यूएईमध्ये खेळवणार असल्याचे निश्चित झाले. यूएईमध्ये अबुधाबी , दुबई आणि शारजा येथे आयपीएलचे आसामने खेळविण्यात येणार आहे. यूएई मध्ये क्रिकेट मंडळानेही आपल्या बीसीसीआय चे स्वीकृती पात्र मिळाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता आयपीएल यूएई मध्ये होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे .
बीसीसीआयसाठी आयपीएल चा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे म्हटले जात असले तरी आयपीएलच्या आयोजनात एक महत्वाची अडचण आहे हि म्हणजे भारत सरकारची परवानगी मिळत नाही , तोपर्यंत आयपीएल खेळवण्यात येऊ शकत नाही . भारत सरकारने जर आयपीएल ला परवानगी दिली नाही तर आयपीएलला परवानगी दिली नाही तर आयपीएल होऊ शकत नाही, हे नक्की. बीसीसीआय आयपीएलसाठी भारत सरकारची परवानगी कशी मिळवणार , याकडे लक्ष लागले आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा