परिक्षा रद्द करण्यावर सरकार ठाम: उदय सामंत
मुंबई, दि.8 : महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णयावर राज्यसरकार ठाम असल्यामुळे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाविद्यालयीन आणि विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने महाराष्ट्रातील अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्यात येणार नसल्याचे कालच जाहीर केले आहे.मात्र अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याच्या भूमिकेवर राज्य सरकार ठाम असल्याचे उदय सामंत यांनी आज स्पष्ट केले आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला आज पत्र लिहून भुमीका मांडली आहे.
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय उच्च शिक्षण सचिव, आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डि.पी.सिंग पाठवलेल्या पत्रात मंत्री सामंत यांनी म्हटलेआहे कि, कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत तिसय्रा स्थानी असून, महाराष्ट्र हे सर्वाधिक बाधित राज्य आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अंतिम वर्षाच्या सत्रात दहा लाखांपेक्षा आधीक विद्यार्थ्यांची परिक्षा घेणे अतिशय धोकादायक होणार आहे. तसेच त्यामुळे विद्यार्थी ,पालक शिक्षक, पुरक कर्मचारी तसेच इतर यंत्रणा स्वास्थ्य धोक्यात येऊ शकते. सध्या विविध शैक्षणिक संस्था, वसतिगृहे आणि इतर सुविधा या वलगीकरणासाठी तसेच कोरोना बाधित इतर करणांकरिता प्रशासनाद्वारे अधिग्रहीत करण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थी हे त्यांच्या मुळ गावी परतले असल्याने, परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास त्यांची निवास व भोजन व्यवस्था या अवघड बाबी आहेत. असे केल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच काही राज्यामध्ये तसेच देशांमध्ये परिक्षा घेतल्यानंतर बय्राच विद्यार्थ्यांना विषाणूंची लागण झाल्याची घटणा घडून आली आहेत असेही सामंत यांनी सांगितले पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाला 17 मे रोजी विनंती केली होती. पंजाब, राजस्थान, हरियाणा, ओडिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पदुच्चेरी या राज्यानेही अंतिम परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आय.आय. टि.मुंबई, खडगपुर, कानपूर, रूरकी यांनीही समान निर्णय घेतला आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा