क्रीडा विश्व
रोहित शर्माच्या बॅटिंगवर गावसकर म्हणतात. कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा जसं पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करतो. मुंबई . २३. उपकर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीवर भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर दिलो जानसे फिदा झाले आहेत. गावसकर यांनी रोहित शर्माच्या फलंदाजीचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मासारखी फलंदाजी करायला आवडलं आसते, असे गावसकर म्हणाले. ते इंडिया टुडेशी बोलत होते. कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारे पहिले फलंदास सुनिल गावसकर रोहित शर्माची स्तुती करताना म्हणाले की, त्यावेळची परिस्थिती आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे मला रोहित शर्मासारखी मनसोक्त फलंदाजी करायला जमलं नाही. कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा जसं पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करतो तशीच फलंदाजी करायला मलाही आवडलं आसते. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांविरोधात आरामात खेळणाऱ्या रोहित शर्माचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याची फलंदाजीची शैली इतरांपेक्षा वेगळी आहे. विराट कोहलीनंतर रोहित शर्मा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे, ...