क्रीडा विश्व
आयपीएल चे आणखी एक विघ्न दूर
दक्षिण आफ्रिकेतील खेळाडू सहभागी होण्याचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली,ता. ११ : केंद्र सरकारची लेखी परवानगी, लगेचच नव्या प्रयोजकांसाठी निविदा प्रक्रिया सुरु, आयपीएलच्या मार्गातील एकेक अडथळे दूर होण्यास सुरवात झालेली आहे असताना दक्षिण आफ्रिकेचा खेळाडूंना आयपीएलमधील सहाभागीविषयी निर्माण झालेली प्रश्नहि सुटला आहे. चेन्नई संघातील दक्षिण आफ्रिका खेळाडू १ सप्टेंबर रोजी दाखल होतील, असे चेन्नई संघाकडून सांगण्यात आले.
१. फाफ डुप्लेसी
अमिरातीत होत असलेली यंदाची आयपीएल १९ सप्टेंबर सुरु होत आहे. दक्षिण आफ्रिकेत लोकडाउन सुरु असल्यामुळे विमानप्रवास बंद आहे. परिणामी त्यांचे खेळाडू आयपीएल सहभागी होन्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आयपीएल विविध आठ संघात मिळून दक्षिण आफ्रिकेतील १० खेळाडू सहभागी होणार आहेत. विमानप्रवास बंद असल्यामुळे त्यांचे खेळाडू कॅरेबियन लीगमध्येही खेळू शकणार नाहीत.
२. क्विंटन डीकॉक
मात्र दक्षिण आफ्रिकेतही आता अनलॉक प्रक्रिया हळूहळू सुरु होत आहे. या महिन्यापासून काही प्रमाणात विमान सेवा सुरु होत आहे, लवकरच याची सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे . त्यामुळे आयपीएलमधील दक्षिण आफ्रिका खेळाडूंच्या सहभाग निश्चित समजला जात आहे .
चेन्नई सुपर किंग्ज संघातून मिळालेल्या माहितीनुसार फाफ डुप्लेसी आणि वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिजी १ सप्टेंबर रोजी त्यांच्या संघात दाखल होत आहेत . दुबईतील शिबिरात पहिल्या आठवड्यातील सराव शिबीरात ते सहभागी होऊ शकनार नाही, चेन्नई संघातील तिसरा खेळाडू इम्रान ताहीर कॅरेबियन लीगमध्ये खेळणार आहे ; परंतु तो आयपीएल सुरु होत असताना अमिरातीत दाखल होईल, असे सांगण्यात येत आहे.
३. ए. बी. डिव्हिलियर्स.
आयपीएल खेळण्यास आमच्या सर्व खेळाडूंना परवानगी देण्यात असल्याची माहिती दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने मीडिया व्यवस्थापक कोकित्सो गोफेतेजे यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेबरोबर रॉयल चाललेन्जर बंगरूर संघतहि दक्षिण आफ्रिकेतील तीन खेळाडू आहेत
एकूण कमाई ३४. ६ कोटीची
आयपीएल खेळणारे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू ; ए. बी.डिव्हिलियर्स, ख्रिस मॉरिस, डेल स्टेन ( बंगरूर ) क्विंटन डीकॉक ( मुंबई ) फाफ डूप्लेसि, इम्रान ताहीर, लुंगी इंगिडी (चेन्नई सुपर किंग्ज ), कागिजो राबाडा ( दिल्ली कॅपिटलस ) , हाईस विजोन ( पंजाब ) , डेव्हिड मिलर ( राजस्थान रॉयल्स) हे खेळाडू मिळवून आयपीएल मधील ३४. ६ कोटींचा कमाई करणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा