क्रिकेट बातमी
चेन्नई ता. ३१. : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहोली याला अटक करण्यात यावी , या आशयाची याचीका मद्रास उच्च न्यायालयात करण्यात अली आहे . विराट आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना यांना अटक करण्यात यावी . अशी मागणी याचिका कर्त्यांनी केली आहे . ऑनलाईन गॅम्बलिंग ( जुगाराची ) जाहिरात हे दोघेही करत असून अशा प्रकारामुळे जुगाराला प्रोत्साहन दिले जात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
चेन्नईस्थित एका वकिलाने हि याचीका दाखल केली आहे. विराट कोहोली ऑनलाईन जुगाराची जाहिरात करत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. युवकांमध्ये या अँप चे व्यसन वाढत चालले आहे . त्यामुळे ऑनलाईन जुगार खेळण्याच्या अँप्स वर बंदी घालावी अशी मागाणी याचिकार्त्यानी मद्रास उच्च न्यायालयात केली आहे. विराट कोहोली आणि तमन्ना अश्या अँप ची जाहिरात करून करून तरुणांची दिशाभूल करत आहेत . याचिका कर्त्यांनी एका कर्जबाजारी तरुणाचा दाखला दिला आहे . एका मुलाने ऑनलाईन अँप साठी पैसे उसने घेतले होते. पण पैसे परत करू न शकल्याने त्याने आत्महत्त्या केली होती. या प्रकारचा दाखला देण्यात आला आहे .
आयपीएल मध्ये प्रेक्षकांना आणण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली. ता. ३१. : सरकारने मंजुरी दिल्यास यूएईत होणाऱ्या आयपीएल सामन्यासाठी ३० ते ५० % प्रेक्षकांना प्रवेश दिला जाऊ शकतो . असे एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे सचिव शब्बीर उस्मानि यांनी शुक्रवारी सांगितले . मैदानात प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय यूएई सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल असे आयपीएल चेरमन ब्रिजेश पटेल यांनी तारकांची घोषणा करताना म्हटले होते. तरका जाहीर झाल्या तरी भारत सरकारने आयपीएल आयोजनास मंजुरी प्रदान केलेली नाही .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा