' विवो ' चा आयपीएलमधून ब्रेक ?
चीनमधील कंपनीचा लीगपासून दूर होण्याचा गांभीर्याने , लवकरच निर्णयाची शक्यता
नवी दिल्ली,ता.५: विवोला आयपीएलसाठी पुरस्कर्ते कायम राखण्याचा निर्णय आयपीएल प्रशासकीय समितीने घेतल्यापासून देशात संतापाची लाट पसरली आहे . या परीस्थित विवो आयपीएल ब्रेक घेण्याचा विचारात आहे.
विवो इंडिया हा निर्णय लवकरच घेईल अशी चर्चा आहे. हे घडल्यास आयपीएल सयोजनात प्रश्न निर्माण होईल.
आयपीएलमधील एका आघाडीच्या फ्रँचाइजने विवो इंडिया आयपीएलला ब्रेक घेत अन्य फ्रॅंचाईजान कळवले असल्याची चर्चा चालू आहे. आयपीएल सर्व पुरस्कर्ते कायम राहतील, असे भारतीय क्रिकेट मंडळाने जाहीर केल्यापासून देशात पुन्हा चीन विरोधी वादळ घोंगावत लागले आहे . भारतीय मंडळाने आपल्याला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्यामुळे फ्रँचाइजही नाराज आहोत.
चीनमधील अँपवर भातात सरकारने बंदी घातली आहे. तसेच चीनमधील अनेक कंपन्यांबरोबरील करार रद्द होत आहोत. या परस्तीत चीनमधील कंपन्यांबरोबर नते राखण्यापूर्वी आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होते, असे फ्रँचाइजचे मत आहे.
क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सध्या केंद्रातील अधिकाऱ्यांबरोबर आयपीएलबाबत चर्चा सुरु आहे. त्यात विवोच्या उपस्थितीचाहि प्रश्न चर्चेत आला असल्याचे सांगितले जात आहे. आयपीएल प्रशासकीय समितीसह चर्चा करण्यापूर्वीच फ्रॅन्चायजीने मत व्यक्त करीत आहेत, अशी टिप्पणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे समजते.
विवो - भारतीय मंडळात पडद्याआड खलबत्ते
भारतीय मंडळासही विवो पुरस्कर्ते राहिल्यास प्रश्न गंभीर होतील याची जाणीव आहे , तर विवो इंडियास आयपीएलचे पुरस्कर्ते राहिल्यावरही किती फायदा होईल याची शंका वाटत आहे. दोघातील करार लक्षात घेतल्यास करार रद्द करण्याचे जाहीर करणार्यांना जास्त फटका बसनार आहे. या परिस्थितीत दोघाचेही नुकसान होऊ नये , यासाठी चर्चा सुरु असल्याचेही सांगितले जात आहे . त्यात विवो कदाचित या वर्षासाठी लीगसाठी ब्रेक घेण्याचा पर्यायही तपासून बघितला जात आहे.
विवोला वाढत विरोध
अखिल भारतीय व्यापारी संघटनेने विवो आयपीएल पुरस्कर्ते असल्यामुळे या लीगला परवानगी देऊ नये , अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर याना केली आहे. विवो हे आयपीएल चे पुरस्कृरते असल्यामुळे भारतीय मंडळास हि लीग भारतात तसेच परदेशात घेण्यात विरोध करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
विवो दूर झाल्यास पर्याय कोण ?
विवो आणि भारतीय मंडळात २०१७ मध्ये करार झाला. त्यानुसार विवो प्रत्येक मोसमासाठी भारतीय मंडळास ४४० कोटी रुपये देणार आहे विवोपूर्वी करार पेप्सिको सह होता तो करार ३९६ कोटी रुपयांचा होता. आता विवो दूर झाले तर पुरस्कर्ते कोण, हा प्रश्न भारतीय मंडळास सतावत आहे. सध्याच्या कालावधीत आर्थिक व्यवस्था खूपच बिकट आहे, त्यामुळे विवो कडून अपेक्षित असल्याने रकमेच्या पन्नास टक्के मिळवले तरी तो विजय असेल, असे अभ्यासकांचे मत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा