क्रिडा विश्व
एका ओळीच्या प्रसीध्दीपत्रकातून भारतीय क्रिकेट मंडळाने जाहीर केली घडामोड
नवी दिल्ली , ता. ७: शो मस्ट गो ऑन असे आव्हान स्वीकारत बीसीसीआयने यंदाची आयपीएल अमिरात मध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे; पण मुख्य प्रायोजक असलेल्या चीनची मोबाइलला कंपनी विवोबाबत राजनैतिक दडपण वाढल्याने सुवर्ण मध्य काढण्यात आला. अध्या तरी एका मोसमासाठी विवो आणि आयपीएल यांनी काडीमोड घेतला आहे.
यंदाच्या मोसमासाठी विवो आणि बीसीसीआय यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे , असे केवळ एका ओळीचे प्रसिद्धीपत्रक बीसीसीआय ने काढत अधिक माहिती दिली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न अनुउत्तरित राहिले आहेत.
पाच वर्षाचा होता करार
आयपीएलच्या मुख्य प्रयोजकत्वासाठी विवो आणि बीसीसीआय यांच्यात २०१८ ते २०२३ अशा पाच वर्षासाठी २१९० कोटींचा करार झाला होता . दर वर्षासाठी हा करार सुमारे ४४० कोटी इतका होता.
आता बीसीसीआय आणि विवो वेगवेगळ्या मार्गाच्या विचार करत आहेत. २०२१ च्या मोसमापासून विवो पुन्हा आयपीएल मध्ये प्रवेश करण्याचा मार्ग खुला असला, तरी बीसीसीआय च्या पदाधिकाऱ्यांचे वेगळे मत आहे.
सहा महिन्यात चित्र कसे बदलेल?
अमिरातीतील स्पर्धा नोव्हेंबरमध्ये संपेल आणि २०२१ च्या मोसमातील स्पर्धा साधारणतः एप्रिलमध्ये सुरु होईल. चीन विषायी असलेला रोष पाच महिन्यात संपेल किंवा कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुढील मोसमातही विवो नसण्याची शक्यता बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली. गलवान खोऱ्यात २० जवानांवर जीवघेणा हल्ला चिनी सैनिकांनी केला. त्यानंतर देशात चिनीविरुद्ध रोष निर्माण झाला आणि बॉयकॉट चीन अशा मोहीम सर्वच क्षेत्रात सुरु झाल्या. अजूनही लद्द्दाखच्या सीमेवरून चिनी सैनीक माघार घेण्यास तयार नाहीत.
कधी घडल्या हालचाली ?
आयपीएल प्रशासक समिती आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. यात अमिरातीतील स्पर्धेसाठी आराखडा तयार करण्यात आला. मात्र विवोबाबत निर्णय न झाल्यामुळे सर्व स्तरातून बीसीसीआयवर टीका करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसात बीसीसीआय आणि विवो यांनी एकत्रित येऊन हा तोडगा काढला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा