विवो जाताच केंद्राची आयपीएलला मंजुरी
विवो जाताच केंद्राची आयपीएलला मंजुरी
अमिरातीतील स्पर्धेसाठी खेळाडूंचे विलगीकरन ; कोव्हीड -१९ चाचणीची प्रक्रिया सुरु
नवी दिल्ली,ता. ७ ( पीटीआय ) चीनची कंपनी विवो आयपीएलमधून बाहेर जाताच केंद्र सरकारने अमिरातीतील होणाऱ्या आयपीएल तत्त्वात : मंजुरी दिली आहे आणि लगेचच फ्रँचाइजने आपल्याला खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे विलगीकरण आणि कोव्हीड १९ चाचणी प्रक्रिया सुरु केली.
केंद्र सरकारने तत्त्वत: परवानगी दिल्याची माहिती बीसीसीअयनेच दिली. येत्या काही दिवसात लेखी परवानगी येईल, असेही त्यांनी जाहीर केले. बहुतेक संघ २० ऑगस्टला दुबईतसाठी रावना होत आहेत; तर महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई संघ २२ ऑगस्टला रावना होणार आहे. गत विजेत्या मुंबईइंडियन्सने आपल्या खेळाडूंचे विलगीकरण मुंबईत करण्यात सुरवात केली आहे.
काही फ्रँचाइजने आपल्या खेळाडूंची संघाच्या शहरातच कोव्हीड१९ चाचणी करणार आहेत. दिल्ली , मुंबई, चेन्नई , बंगळूर या संघातील खेळाडूंची चाचणी या शहारातच होणार आहे. पहिली दोन चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर पुढील दुसरी २४ तासांत केल्या जाणार आहेत आणि त्या निगेटिव्ह आल्यावर खेळाडू दुबईसाठी रावना होतील. दुबईतील सहा दिवसाच्या विलगीकरणावर खेळाडूंनी नापसंती व्यक्त केली आहे. हा कालावधी तीन दिवसाचा करावा, अशी मागणी फ्रँचाइजने करत आहेत.
रिसॉर्टचा पर्याय
१. अमिरातीतील खेळाडूंची निवास व्यवस्था महत्वाची ठरणार आहे. एका फ्रँचाइसने रिसॉर्टच आरक्षित करत आहे . त्यामुळे खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कुटुंब एकाच ठिकाणी राहतील ; तसेच सुरक्षा आणि शेफही स्वतःचाच ठेवल्यामुळे सुरक्षा अधिक काटेकोर करता येईल , असे त्यांचे म्हणणे आहे.
२ . एका फ्रॅन्चाइसीने अबू धाबीत पूर्ण हॉटेलचं आरक्षित करण्याचा विचार करत आहे. २०१४ मधील आयपीएल या हॉटेलमधील निवास त्याच्यासाठी सुदैवी ठरला होता, असे त्यांचे म्हणणे आहे .
संघावर मर्यादा
एका संघात जास्तीत जास्त २४ खेळाडूंचे अमिरातीच्या न्यावे लागणार, असे बीसीसीआयने आदेश दिले. आहेत. परंतु सपोर्ट स्टाफवर मर्यादा घातलेली नाही. काही फ्रॅन्चाइसने तर आपली वैधकीय टीम अधिक भक्कम करणार आहेत. त्यामुळे त्यांची संख्या ६० पर्यंत जाण्याची शक्यता आहे, काही बदली खेळाडूंना तयार ठेवण्यातही येऊ शकेल.
बॉलिंग मशीनसह धोनीचा सराव
रांची : महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या पूर्वतयारीसाठी रांचीत त्याने बॉलिंग मशीन च्या साह्याने केला आहे. हा सराव त्याने सुरु केला . त्याच्याबरोबर सराव करताना बॉलिंग मशीन यंत्र ऑपरेट करणारी व्यक्ती हे दोघेच मैदानात होते. विश्वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात लढतीनंतर धोनीचा पहिला स्पर्धात्मक सामना आयपीएलमधील असेल. कोरोनामुळे सर्व काही थांबण्यापूर्वी धोनीने चेन्नई संघातील सहकार्यांनी चिदंबरम स्टेडियमवरव सराव केला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा