विवो जाताच केंद्राची आयपीएलला मंजुरी
विवो जाताच केंद्राची आयपीएलला मंजुरी अमिरातीतील स्पर्धेसाठी खेळाडूंचे विलगीकरन ; कोव्हीड -१९ चाचणीची प्रक्रिया सुरु नवी दिल्ली,ता. ७ ( पीटीआय ) चीनची कंपनी विवो आयपीएलमधून बाहेर जाताच केंद्र सरकारने अमिरातीतील होणाऱ्या आयपीएल तत्त्वात : मंजुरी दिली आहे आणि लगेचच फ्रँचाइजने आपल्याला खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे विलगीकरण आणि कोव्हीड १९ चाचणी प्रक्रिया सुरु केली. केंद्र सरकारने तत्त्वत: परवानगी दिल्याची माहिती बीसीसीअयनेच दिली. येत्या काही दिवसात लेखी परवानगी येईल, असेही त्यांनी जाहीर केले. बहुतेक संघ २० ऑगस्टला दुबईतसाठी रावना होत आहेत; तर महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई संघ २२ ऑगस्टला रावना होणार आहे. गत विजेत्या मुंबईइंडियन्सने आपल्या खेळाडूंचे विलगीकरण मुंबईत करण्यात सुरवात केली आहे. काही फ्रँचाइजने आपल्या खेळाडूंची संघाच्या शहरातच कोव्हीड१९ चाचणी करणार आहेत. दिल्ली , मुंबई, चेन्नई , बंगळूर या संघातील खेळाडूंची चाचणी या शहारातच होणार आहे. पहिली दोन चाचणी निगेटि