आयपीएल चा अंतिम सामना पुढे ढकलणार
मुंबई ता ३०. : यंद संयुक्त अरब अमिरात येथे प्रस्तावित असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या वेळापत्रक बदल शक्य होणार आहे आयपीएल अंतिम सामना दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात येणार आहे . यापूर्वी आयपीएल आयोजन १९ सप्टेंबरपासून यूएई मध्ये होणार होते . अंतिम सामना ८ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार होता. ८ एवजी १० नोव्हेंबरला अंतिम सामना होणार असल्याचे समजते. दिवाळीच्या आठवड्यात आयपीएल सामने अंतिम टप्प्यात असायला हवे , अशी प्रसारणकर्ते स्टार इंडियाची मागणी होती. यामुळे टीव्ही प्रेक्षकांच्या संख्येत भर पडेल शिवाय जाहिरातदार वाढतील, असा यामागे तर्क होता. बीसी सीआय मात्र याकडे दुर्लक्ष केले. तथापि आता त्याचाही आग्रह लक्षात घेत अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबर खेळवण्यावर येत्या तीन दिवसात अंतिम निर्णय होईल, असे दिसते. बीसीसीआयच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक २ ऑगस्ट रोजी होणार आहे . ...